तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेली वृद्ध महिला वाघाच्या हल्ल्यात ठार
चंद्रपूर : तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेली वृद्ध महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना काल रविवारी (११ मे) मूल तालुक्यातील नागाळा गावात घडली. विमल बुद्धाजी शेंडे (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे.
जिल्हाभरात तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला पुरुष पहाटेपासून तेंदुपत्ता तोडण्याकरता जंगलात जातात. वर्षात एकदाच होणारे हंगामातून गरीब कुटुंबीयांना थोड्याफार आर्थिक मदतीचा पाठबळ मिळतो असतो.
Chandrapur Tiger attack | वाघाच्या हल्ल्यात 3 महिला ठार
चंद्रपूर तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे ही महिला आज रविवारी चिचप्पली वनपरिक्षेत्रातील 537 कंपार्टमेंटमध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली होती. दबा धरून बसलेल्या वाघाने वृद्ध महिलेवर अचानक हल्लाकेला त्या मध्ये ती ठार झाली. ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. परंतु ती आढळून आली नाही. चिचपल्ली वन विभाग व पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येत कुटुंबीयांनी भेट घेतली. माहिती घेऊन चिचपल्ली वनपरिक्षेत्रात शोधाशोध सुरू केली. कंपार्टमेंट नंबर 537 मध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वन व पोलीस विभागाने मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले असून मृतक महिलेच्या कुटुंबीयांना तत्काळ पंचवीस हजाराची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यात मोहफुले वेचायला गेलेला व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार
काल शनिवारी मूल तालुक्याला लागूनच असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल गावातील तीन महिला तेंदू पत्ता तोडण्यासाठी गेल्या असत्या त्यांचेवर वाघाने हल्ला करून एकापाठोपाठ तिघींनाही ठार केले. ही घटना ताजी असतानाच लागून असलेल्या मूल तालुक्यात पुन्हा वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना समोर आल्याने सिंदेवाही व मूल तालुक्यात भीतीमुळे वातावरण पसरलेला आहे. वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी केली.
चंद्रपूर : तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेली वृद्ध महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना काल रविवारी (११ मे) मूल तालुक्यातील नागाळा गावात घडली. विमल बुद्धाजी शेंडे (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे.
जिल्हाभरात तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला पुरुष पहाटेपासून तेंदुपत्ता तोडण्याकरता जंगलात जातात. वर्षात एकदाच होणारे हंगामातून गरीब कुटुंबीयांना थोड्याफार आर्थिक मदतीचा पाठबळ मिळतो.
Chandrapur Tiger attack | वाघाच्या हल्ल्यात 3 महिला ठार
मूल तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे ही महिला आज रविवारी चिचप्पली वनपरिक्षेत्रातील 537 कंपार्टमेंटमध्ये तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेली होती. दबा धरून बसलेल्या वाघाने वृद्ध महिलेवर अचानक हल्लाकेला त्या मध्ये ती ठार झाली. ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. परंतु ती आढळून आली नाही. चिचपल्ली वन विभाग व पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येत कुटुंबीयांनी भेट घेतली. माहिती घेऊन चिचपल्ली वनपरिक्षेत्रात शोधाशोध सुरू केली. कंपार्टमेंट नंबर 537 मध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वन व पोलीस विभागाने मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले असून मृतक महिलेच्या कुटुंबीयांना तत्काळ पंचवीस हजाराची आर्थिक मदत करण्यात आली आहे.