SONU WALKE, DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.
कंत्राटदार सहित ग्रामपंचायत आणि मंदिर ट्रस्ट नि लक्ष देण्याची गरज.
मार्कंडा देव (प्रतिनिधी):
विदर्भाची काशी म्हणून ओडख असलेलं प्रसिद्ध मार्कंडा देव मंदिर परिसरात सध्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून अधिक मास असल्याने भाविकांची गर्दी वाढली आहे त्यामुळे भाविक, स्थानिक नागरिक आणि रस्त्यालगतचे व्यापारी प्रचंड त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत, मंदिर ट्रस्ट यांचे नियोजन असते तर हे झालं नसत, रस्त्याचे काम करणाऱ्या एमएसआरडीसीच्या(MSRDC) कंत्राटदाराकडून योग्य नियोजनाचा अभाव असल्याने आणि मुजोरीने काम करण्याच्या पद्धतीने परिस्थिती आणखी बिघडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आलेले नाही. पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था किंवा वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना नसल्याने मंदिर परिसरात दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि रोजच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांना बसत आहे.
नागरिकांनी अनेकदा संबंधित कंत्राटदार तसेच प्रशासनाकडे तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप केला आहे. उलट स्थानिकांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून कामे सुरू असल्याने कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.विशेष बाब म्हणजे कंत्राटदार ने कामाचे आणि नियोजनाचे मोठे मोठे बॅनर लावायला पाहिजे तस होताना दिसत नाही.
विशेष म्हणजे, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मार्कंडा देव परिसरात गर्दीचे नियोजन करणे ही ग्रामपंचायत आणि मंदिर ट्रस्टची जबाबदारी असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. स्थानिकांच्या मते, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न “जैसे थे” कायम आहे.
नागरिकांनी तातडीने वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, वाहतूक पोलिसांची नियुक्ती आणि रस्ते कामांचे टप्प्याटप्प्याने नियोजन करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
रस्ते कामांमुळे मार्कंडा देव परिसरात वाहतूक कोंडी वाढली
भाविक, नागरिक आणि व्यापारी त्रस्त
ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्टच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
एमएसआरडीसी(MSRDC) कंत्राटदाराच्या नियोजनावर नागरिकांचा संताप
तक्रारींनंतरही परिस्थिती कायम; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
“धार्मिक स्थळाच्या विकासाच्या नावाखाली नागरिकांचे हाल होत असतील, तर तो विकास नसून नियोजनशून्यतेचा नमुना ठरतो,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.