SONU WALKE,DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.
अश्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला गावात राहण्याचं अधिकार नाही अशी चर्चा चामोर्शीत होत आहे.(मन हेलावून टाकणारी घटना.)
प्रेस नोट
चामोर्शी ::– चामोर्शी शहरातील एका सात वर्षीय चिमुरडीवर शहरातील २७ वर्षीय प्रज्वल सदाशिव भांडेकर,चामोर्शी नामक युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची किळसवाणी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिनांक ८ जुन रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार चामोर्शी शहरातील एका वॉर्डतील फिर्यादीच्या घराच्या स्लॅबवर पेटंचे काम सुरू असताना त्यांचे काम सुरू असताना पेंट करणाऱ्या युवकाने स्लॅबवर खेळत असलेल्या फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस बाजूला नेऊन लैंगिक अत्याचार केला यापूर्वीही या युवकावर २०१९ मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होतं विशेष सदर आरोपीला 24 तासाच्या आत पोलीस निरीक्षक यांच्या उत्तम कामगिरीने मार्गदर्शनाखाली तात्काळ अटक करण्यात करण्यात यश आले, याबाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीसांनी कलम २८०/२०२६कलम ६४(१),६५(२) बिएनएस २०२३ सहकलम लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४,६, अन्वेय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक(PI) दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले व सहाय्यक फौजदार रामदास कोडापे हे करीत आहेत.