HomeBreaking Newsडोनी फाट्याजवळील धोकादायक खड्डे स्वराज्य स्वाभिमानी संघटनेकडून बुजविण्याचा उपक्रम

डोनी फाट्याजवळील धोकादायक खड्डे स्वराज्य स्वाभिमानी संघटनेकडून बुजविण्याचा उपक्रम

डोनी फाट्याजवळील धोकादायक खड्डे स्वराज्य स्वाभिमानी संघटनेकडून बुजविण्याचा उपक्रम

अपघातांना आळा घालण्यासाठी युवकांचा सामाजिक पुढाकार; नागरिकांकडून कौतुक

मूल, प्रतिनिधी :
मूल राष्ट्रीय महामार्गावरील डोनी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या खड्ड्यांमुळे अनेकदा किरकोळ तसेच गंभीर अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रशासनाचे लक्ष वेधूनही तातडीने दुरुस्ती न झाल्याने स्वराज्य स्वाभिमानी संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविला.
संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रमदान करून सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने खड्डे बुजविले. या उपक्रमामुळे वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून अपघातांचा धोका कमी होण्यास मदत झाली आहे. युवकांच्या या लोकहितवादी उपक्रमाचे नागरिक व प्रवाशांकडून कौतुक करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे महामार्गाची कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी स्वराज्य स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आकाश कावळे, शुभम मुत्यालवार, नमेश मेश्राम, अक्षय गगपल्लीवार, आकाश निकुरे, अक्षय जराते, राम गाजेवर, गणेश मंथनवार, अनंता रस्से, घोटेकर सर, प्रशांत मुत्यारपवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
डोनी फाट्याजवळील धोकादायक खड्डे बुजविताना स्वराज्य स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments