Homeगडचिरोलीकोट्यवधींच्या डांबरीकरणानंतर अवघ्या काही महिन्यांत रस्ता खोदला; शासनाच्या निधीची उधळपट्टी?लगेच MSRDC चे...

कोट्यवधींच्या डांबरीकरणानंतर अवघ्या काही महिन्यांत रस्ता खोदला; शासनाच्या निधीची उधळपट्टी?लगेच MSRDC चे काम चालू ,फायदा कुणाचा??

SONU WALKE, DEPUTY EDITOR, LOKWAD NEWS.

ग्रामपंचायत मार्कंडा देव यांनी MSRDC च्या निकृष्ट कामाची तक्रार तहसीलदार, उपविभागीय अधिकारी(SDO) आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

मार्कंडा (ता. चामोर्शी), प्रतिनिधी : मार्कंडा देव ते फराडा मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे चार ते पाच महिने उलटत नाहीत तोच एमएसआरडीसी (MSRDC) अंतर्गत नवीन कामांसाठी हा रस्ता पुन्हा खोदण्यात आला आहे. आता याच मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्ता होणार असल्याची माहिती समोर येत असल्याने शासनाच्या निधीच्या नियोजनावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जर या मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्याचे नियोजन आधीपासूनच होते, तर काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून डांबरीकरण करण्याची गरज काय होती? तसेच डांबरीकरणासाठी खर्च झालेला निधी आता वाया गेला नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मार्कंडा हे विदर्भातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ असल्याने या मार्गावर दररोज हजारो भाविक व पर्यटकांची वर्दळ असते. मात्र प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे एकाच रस्त्यावर अल्पावधीत दोनदा कामे केली जात असल्याचा आरोप होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून, डांबरीकरणाच्या कामाला मंजुरी कोणी दिली, त्यावेळी भविष्यातील सिमेंट रस्त्याच्या प्रस्तावाची माहिती संबंधित विभागांना होती का, तसेच शासनाच्या निधीची हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, याचा खुलासा करण्याची मागणी होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments