HomeWadsaजनहिताच्या प्रश्नांवर काँग्रेसचे भव्य निदर्शन; सरकारविरोधात घोषणाबाजी

जनहिताच्या प्रश्नांवर काँग्रेसचे भव्य निदर्शन; सरकारविरोधात घोषणाबाजी

SONU WALKE, DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.

देसाईगंज, दि. 31 मे : वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तसेच नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या विविध विभाग व सेलच्या वतीने रविवारी हुतात्मा स्मारक, देसाईगंज येथे भव्य निदर्शन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत विविध जनहिताच्या मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.
आंदोलनादरम्यान इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर वाढत असलेल्या आर्थिक ताणाकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या धान व मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करून प्रलंबित चुकारे तातडीने अदा करावेत, अशी मागणी करण्यात आली. नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करीत राहील, असा निर्धार आंदोलनादरम्यान व्यक्त करण्यात आला.
आंदोलनात जीवन पाटील नाट, परसराम टिकले, राजेंद्र बुल्ले, मिलिंद खोब्रागडे, प्रभाकर तुलावी, जयंत हरडे, नितीन राऊत, गिरीधर तितराम, इलियास पठाण, प्रकाश समर्थ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. महिला कार्यकर्त्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments