SONU WALKE,DEPUTY EDITOR,LOKWAD NEWS.
देसाईगंज | प्रतिनिधी
देसाईगंज तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून समाजवादी पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. आमदार Ramdas Masram यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची वाट धरली.
समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियाज पठाण यांच्या पाठोपाठ पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये राणी मुजीब शेख, हाजरा रबीब शेख, कैलास बगमारे, गीताबाई नैताम, शरीफ शेख (मुन्नाभाई), जावेद शेख, जुबेर कलाम शेख, मुजीब गफ्फार शेख आणि तहेसीन पठाण यांचा समावेश आहे.
यावेळी आमदार रामदास मसराम यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करत काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देण्यासाठी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला.
या कार्यक्रमाला परसराम टिकले, राजेंद्र बुल्ले, जीवन पाटील नाट, नितीन राऊत, इलियाज पठाण, कमलेश बारस्कर, परशुराम ठाकरे, सागर वाढई, वैष्णवी आकरे, आशाताई झोडे, रोयाजूल रब्बीर शेख यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे देसाईगंज परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.