सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
चामोर्शी : शहरात विविध विकासकामे सुरू असताना त्या कामांची संपूर्ण माहिती नागरिकांसमोर स्पष्टपणे येणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नगरपंचायत हद्दीत,प्रत्येक प्रभागात होणाऱ्या प्रत्येक विकासकामाच्या ठिकाणी माहिती फलक लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी रस्ते, नाली, सिमेंट काँक्रीट, इमारत बांधकाम किंवा इतर विकासकामे सुरू असतात; मात्र कामाची किंमत किती, निधी कोणत्या योजनेतून मंजूर झाला, कामाचा कालावधी किती, कंत्राटदार कोण आहे आणि कामाची गुणवत्ता तपासणी कोण करणार याची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध होत नाही.
नगरपंचायत चामोर्शीमध्ये कोणते कंत्राटदार काम करतात, किती कामे मंजूर झाली, कोणत्या योजना आल्या, किती निधी आला, किती खर्च झाला आणि किती शिल्लक आहे याची स्पष्ट माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. विकासकामांचा हिशोब बंद फाईलमध्ये नव्हे तर सार्वजनिक माहिती फलकावर दिसला पाहिजे; कारण पारदर्शकता हीच लोकशाहीची खरी ओळख आहे.”
माहिती फलक अनिवार्य केल्यास कामामध्ये अधिक पारदर्शकता येऊ शकते. त्यावर कामाचे नाव, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, काम सुरू व पूर्ण होण्याची तारीख, संबंधित कंत्राटदाराचे नाव आणि जबाबदार विभागाची माहिती नमूद केल्यास नागरिकांनाही कामांवर नजर ठेवता येईल.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, माहिती फलकामुळे “किती काम झाले, किती रुपयांचे झाले आणि नेमके काम कोण करत आहे?” याची माहिती जनतेला थेट मिळेल. त्यामुळे निकृष्ट कामांवर आळा बसून प्रशासन आणि नागरिकांमध्ये विश्वासही वाढेल.
“विकासकामे फक्त कागदावर नव्हे, तर माहिती फलकावरही दिसली पाहिजेत; तेव्हाच पारदर्शकतेला खरा अर्थ मिळेल