Homeगडचिरोलीव्हॉइस ऑफ मीडिया चे सदस्य सुधीर गडपायले यांची वेळेवर माहिती ठरली जीवनदायी;...

व्हॉइस ऑफ मीडिया चे सदस्य सुधीर गडपायले यांची वेळेवर माहिती ठरली जीवनदायी; विहिरीत पडलेल्या युवकासाठी पोलिसांचे तातडीने बचावकार्य

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी : गणेश नगर, चामोर्शी येथील संतोष जुवारे हा युवक अचानक विहिरीत पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वाईस ऑफ मीडियाचे सुधीर गडपायले यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत पोलिसांना माहिती दिली आणि मदतकार्य सुरू केले.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. मा. पोनि दीपक डोंब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली (API )बनसोडे साहेब, पोलीस उपनिरीक्षक कोसनसिले साहेब तसेच पोलीस कर्मचारी चिडे, झाडे, पिपरे, तरंगे यांनी तत्परतेने मदतकार्य राबवून संतोष जुवारे यांना विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले.

वेळीच मिळालेल्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली असून स्थानिक नागरिकांकडून पोलिस प्रशासन व सुधीर गडपायले यांच्या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments