Homeगडचिरोलीपद बदलले... पण जनतेच्या मनातील स्थान कायम; माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या...

पद बदलले… पण जनतेच्या मनातील स्थान कायम; माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या कार्याची कार्यकर्त्यांकडून प्रशंसा.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली : काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या कार्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये कृतज्ञतेची भावना व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या संदेशातून “पद बदलू शकते, पण कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मनातील स्थान बदलत नाही” असा सूर उमटताना दिसत आहे.
सदर संदेशात महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केवळ पद भूषवले नाही, तर हजारो कार्यकर्ते, युवक, ओबीसी व विविध समाजघटकांना पक्षाशी जोडण्याचे कार्य केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Oplus_131072
Oplus_131072

गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे, संघटन मजबूत करणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आपलेसे मानून काम करणे, हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक नेतृत्वात विविध समाजघटकांना संधी मिळावी, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असल्याचे या संदेशातून स्पष्ट होते.
दरम्यान, हा कोणाविरोधातील प्रश्न नसून पक्षात सर्वांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे आणि संघटना अधिक मजबूत व्हावी, हीच भावना असल्याचेही कार्यकर्त्यांनी अधोरेखित केले आहे. राजकीय वर्तुळात या संदेशाची सध्या चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात काँग्रेसमधील संघटनात्मक घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments