Homeगडचिरोलीगडचिरोली-उमरखेड बस अपघात : खासदार डॉ. नामदेव किरसान व  महेंद्र ब्राह्मणवाडे यांची...

गडचिरोली-उमरखेड बस अपघात : खासदार डॉ. नामदेव किरसान व  महेंद्र ब्राह्मणवाडे यांची रुग्णालयात धाव, जखमींची केली विचारपूस.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

गडचिरोली | 
गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गुरुवारी सकाळी नवेगाव-मुरखळा गावाजवळ भीषण अपघातग्रस्त झाली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने दोन पलट्या घेत रस्त्याच्या कडेला उलटल्याची दुर्घटना घडली. या अपघातात एका पुरुषासह एक महिला आणि एका लहान बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. नामदेव किरसान व महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांच्या उपचारांबाबत डॉक्टरांशी चर्चा केली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याशी चर्चा करून गंभीर जखमींवर तातडीने उपचार करण्यात यावेत तसेच आवश्यक शस्त्रक्रिया त्वरित करण्यात याव्यात, अशा सूचना खासदार डॉ. किरसान यांनी दिल्या.
या भेटीदरम्यान नगरसेवक सतीश विधाते, उपसरपंच दिवाकर निसार, सरपंच सोरटे साहेब, नदीम नाथानी, दिलीप घोडाम, स्वप्निल ताडाम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments