Homeगडचिरोलीनीट पेपर लीक, महागाई आणि युवकांवरील कथित वक्तव्याविरोधात NSUI आक्रमक; उपविभागीय अधिकाऱ्यांना...

नीट पेपर लीक, महागाई आणि युवकांवरील कथित वक्तव्याविरोधात NSUI आक्रमक; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी प्रतिनिधी : नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस दरवाढ तसेच युवकांबाबत करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा एनएसयूआयतर्फे तीव्र संताप व्यक्त करत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित केंद्रीय मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला. शासनाच्या निष्काळजीपणा व भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचे नमूद करत गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात, मात्र पैशांच्या बळावर व भ्रष्ट मार्गाने पेपर फुटल्याने त्यांच्या कष्टांना न्याय मिळत नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. सततच्या महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून शासनाने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय युवकांबाबत करण्यात आलेल्या “युवा काकरोच की तरह होते हैं” या कथित वक्तव्याचाही निषेध व्यक्त करण्यात आला. हे वक्तव्य युवकांचा अपमान करणारे व असंवेदनशील असल्याचा आरोप करत संबंधितांनी सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रशासनाने तातडीने योग्य कारवाई न केल्यास युवक लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला.
यावेळी गडचिरोली जिल्हा एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, तालुका सोशल मीडिया अध्यक्ष विजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत राऊत, तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोगले यांच्यासह अनेक पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments