Homeगडचिरोलीकुनघाडा रै. केंद्रशाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुडझेप; तब्बल १२ विद्यार्थी उत्तीर्ण!

कुनघाडा रै. केंद्रशाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुडझेप; तब्बल १२ विद्यार्थी उत्तीर्ण!

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी (कुनघाडा रै) :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) मध्ये जि.प. उच्च प्राथमिक केंद्रशाळा कुनघाडा रै. (मुले) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील या शाळेतील तब्बल १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची आणि शैक्षणिक गुणवत्तेची कसोटी मानली जाते. अशा प्रतिष्ठेच्या परीक्षेत कुनघाडा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे जिल्हा परिषद शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन दिले जात असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची अथक मेहनत यांचा सुंदर संगम या यशामागे असल्याचे बोलले जात आहे.
चमकलेले यशाचे १२ तारे
शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये –
वृषभ रवींद्र कुनघाडकर, वेधक गजानन भांडेकर, आश्रय जितेंद्र वैरागडे, श्रीओम बाळकृष्ण मेश्राम, श्रेयस सचिन दूधबळे, सौगंध सचिन सातपुते, शौर्य ज्ञानेश्वर सातपुते, अखिल रिंगनाथ चापडे, आराध्य सुभाष देवोजवार, अवैश मो. जावेद शेख, संस्कार अशोक वासेकर आणि तेजस दिलीप टिकले यांचा समावेश आहे.
या यशामागे मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक गुरुदास सोनटक्के यांचे नेतृत्व, विशेष शिक्षक दिलीप खोब्रागडे, मार्गदर्शक विजय दुधबावरे तसेच शिक्षक देवाजी वन्नेवार, अंजली तंगडपल्लीवार, अनिल दुर्गे आणि अभिषेक लोखंडे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. शिक्षकांनी घेतलेली अहोरात्र मेहनत आणि विद्यार्थ्यांनी केलेला जिद्दीचा अभ्यास या यशाचा भक्कम पाया ठरला आहे.

प्रतिक्रिया :
“आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश शाळेचा आणि गावाचा अभिमान आहे. शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे हे ऐतिहासिक यश शक्य झाले आहे,” अशी भावना शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.
या अभूतपूर्व यशामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षण विभाग, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments