HomeBreaking Newsसादागड परिसरात अस्वलाचा हल्ला; महिला गंभीर जखमी

सादागड परिसरात अस्वलाचा हल्ला; महिला गंभीर जखमी

सादागड परिसरात अस्वलाचा हल्ला; महिला गंभीर जखमी

प्राथमिक उपचारानंतर गडचिरोली येथे हलविले, परिसरात भीतीचे वातावरण

सावली प्रतिनिधी लोकवाद:  सावली तालुक्यातील सादागड परिसरात रविवारी सकाळी अस्वलाच्या हल्ल्यात एका महिलेवर गंभीर जखमी होण्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. गयाबाई शिवाजी मडावी (वय ६०) रा. सादागड या रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास गावालगतच्या जंगल परिसरात गेल्या होत्या. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. या भीषण हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, कपाळावर तसेच चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. नागरिकांचा आवाज व हालचाल पाहून अस्वल जंगलाच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर जखमी अवस्थेतील गयाबाई मडावी यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय सावली येथे दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून परिसराची पाहणी केली. सादागड परिसर जंगलालगत असल्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी जंगल परिसरात जाताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments