HomeBreaking Newsआष्टीत घरगुती गॅसचा तुटवडा; सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याचा नागरिकांचा गंभीर आरोप.

आष्टीत घरगुती गॅसचा तुटवडा; सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याचा नागरिकांचा गंभीर आरोप.

सोनू वाळके,उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

आष्टी | चामोर्शी

चामोर्शी तालुक्यातील आष्टी गावात घरगुती एलपीजी गॅस cylinder तीव्र टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. वेळेवर cylinder उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, याच पार्श्वभूमीवर काही व्यक्तींकडून गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

आष्टी येथील एका LPG धारकांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील ३५ पेक्षा अधिक कुटुंबांना नियमित एलपीजी सिलिंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. आवश्यक वस्तू असलेल्या घरगुती गॅससाठी नागरिकांना वारंवार प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, काही व्यक्तींकडून घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा करून त्यांची ₹१२०० ते ₹१५०० या वाढीव दराने विक्री केली जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. जर हे आरोप सत्य असतील, तर ही बाब गंभीर असून संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असताना प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments