Homeगडचिरोलीचामोर्शी पोलिसांची दमदार कारवाई ; २ लाख ३९ हजारांचे ११ मोबाईल हस्तगत.

चामोर्शी पोलिसांची दमदार कारवाई ; २ लाख ३९ हजारांचे ११ मोबाईल हस्तगत.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी :

गहाळ व चोरीच्या मोबाईल प्रकरणांवर प्रभावी कारवाई करत चामोर्शी पोलिसांनी तब्बल रु. २,३९,०००/- किमतीचे ११ अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मागील काही कालावधीत चामोर्शी परिसरातून हरविलेले व चोरीस गेलेले मोबाईल CEIR पोर्टलच्या सहाय्याने तसेच तांत्रिक कौशल्याचा वापर करून शोधण्यात पोलिसांना यश आले.

पोलीस ठाण्याच्या वार्षिक निरीक्षणासाठी आलेले गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना मोबाईल परत करण्यात आले. यावेळी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे उपस्थित होते.

ही संपूर्ण कारवाई चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस अंमलदार मनीषा चिताडे व पोलीस अंमलदार भावेश वरगंटीवार यांनी पार पाडली.

मोबाईल चोरी व गहाळ प्रकरणांमध्ये तांत्रिक तपासाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देणारी ही कारवाई ठरली असून, चामोर्शी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.  पोलिसांनी दाखविलेली ही कामगिरी जिल्हा पोलिस दलासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments