Homeगडचिरोलीलाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची हत्या; नीट पेपरफुटीतील आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा —...

लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची हत्या; नीट पेपरफुटीतील आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा — एन.एस.यु.आय.(NSUI) ची मागणी.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी : देशभरातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘NEET-UG 2026’ परीक्षा अखेर केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आणि पेपरफुटी झाल्याच्या आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर एन.एस.यु.आय.च्या वतीने चामोर्शी येथे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी प्रशांत घोरुडे यांना निवेदन देण्यात आले. लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत घेऊन वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहतात, पालक मोठ्या आर्थिक अडचणी सहन करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करतात; मात्र अशा पेपरफुटीच्या घटनांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासच हादरला असल्याची तीव्र प्रतिक्रिया एन.एस.यु.आय.ने व्यक्त केली.

“पेपरफुटी हा केवळ गैरप्रकार नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची हत्या आहे. देशातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) बरखास्त करण्यात यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री Dharmendra Pradhan यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी एन.एस.यु.आय.चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, सहसचिव साहिल धोबे, मयुरी कुनघाडकर, अजय भांडेकर, विजय कुनघाडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments