सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.
गडचिरोली : देशभरातील औषध विक्रेत्यांच्या प्रमुख संघटना All India Organisation of Chemists and Druggists (AIOCD) तसेच Maharashtra State Chemists and Druggists Association (MSCDA) यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली बुधवार, 20 मे 2026 रोजी ‘ऑल इंडिया केमिस्टस् बंद’ची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील औषध दुकानदारही सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील औषध सेवा दिवसभर ठप्प राहण्याची शक्यता आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारकडून ऑनलाइन औषध विक्रीला दिली जाणारी मोकळीक, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिले जाणारे अव्यवसायिक डिस्काउंट आणि बनावट औषधांच्या वाढत्या साखळीमुळे पारंपरिक औषध व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
संघटनांनी विशेषतः GSR 817 दि. 28 ऑगस्ट 2018 हा ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भातील नियम मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच कोविड काळात लागू करण्यात आलेला GSR 220 दि. 26 मार्च 2020 हा आदेश रद्द करून बनावट औषधांच्या विक्रीवर आळा घालावा, अशीही भूमिका मांडण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “ऑनलाइन सवलतींच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल होत असून छोट्या औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर भविष्यात ग्रामीण भागातील औषध सेवा कोलमडण्याची भीती आहे.”
या आंदोलनाचे नेतृत्व AIOCD चे अध्यक्ष Jagannath Shinde, सचिव Rajiv Singhal, MSCDA चे अध्यक्ष Jagannath Shinde, सचिव Anil Navandar तसेच गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष Devendra Somankar आणि सचिव Prakash Datta यांचा सुद्धा गडचिरोली जिल्यासाठी पाठींबा आहे.
बंद दरम्यान रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल संघटनांनी दिलगीरी व्यक्त केली असली तरी “औषध व्यवसाय आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी हा लढा आवश्यक आहे,” असा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे.