HomeWadsaदेसाईगंज-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची आमदार रामदास मसराम यांच्याकडून पाहणी.

देसाईगंज-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची आमदार रामदास मसराम यांच्याकडून पाहणी.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

दि.१२ मे २०२६ :– देसाईगंज ते कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुनी मोरगाव पॉईंट, शंकरपूर तसेच अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार  रामदास मसराम यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी आमदार मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश दिले. खराब रस्त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

त्या प्रसंगी उपस्थित माजी सभापती परसरामजी टिकले,काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष देसाईगंज राजेंद्रजी बुल्ले, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार सर,नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान,नगरसेवक राजूभाऊ रासेकर, सामाजिक कार्यकर्ते विलास बन्सोड, सामाजिक कार्यकर्ते कमलेश बारस्कर,कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर, कनिष्ठ अभियंता अमित रामटेके, राजलक्ष्मी प्रोजेक्ट डायरेक्टर पराग केसरकर, वरुण देव शर्मा उपस्थित होते. 

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments