Homeगडचिरोलीग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आमदारांकडून आरोग्य सेवांचा सखोल आढावा.

ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आमदारांकडून आरोग्य सेवांचा सखोल आढावा.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

धानोरा : ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आयोजित सनियंत्रण व सल्लागार समितीच्या बैठकीत तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत रुग्णालयातील विविध त्रुटींवर चर्चा करत आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
बैठकीदरम्यान आपल्या जबाबदारीत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले. तसेच ईसीजी निदान प्रक्रियेत केवळ तांत्रिक अहवालांवर अवलंबून न राहता वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्रत्यक्ष अनुभवाला प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या. पोस्ट मॉर्टम कक्षात आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी गरोदर माता व अस्थिव्यंग रुग्णांना विनाकारण इतरत्र संदर्भित न करता स्थानिक स्तरावरच संवेदनशीलपणे उपचार देण्याबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना करण्यात आल्या.
दरम्यान, धानोरा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावाही घेण्यात आला. सध्या ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित निधीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सुधारित प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. परिसरातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षाताई लहाडे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. गजभियेजी, डॉ. भागराजजी दुर्वे, भाजप किसान प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपा प्रदेश सदस्य प्रमोदजी पिपरे, ज्येष्ठ नेते अनंतजी साळवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, भाजप जिल्हा सचिव सारंजजी साळवे, नगरसेवक संजयजी कुंडू, नगरसेविका भूमिताताई परचाके तसेच भाजपा पदाधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments