HomeWadsaदेसाईगंजमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ उत्साहात संपन्न.

देसाईगंजमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ उत्साहात संपन्न.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

देसाईगंज, दि. ०८ एप्रिल २०२६ :
नगर परिषद सांस्कृतिक भवन, देसाईगंज येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा-१ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करत प्रशासनाने शासनाच्या योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करावे, असे आवाहन केले.
महसूल विषयक अडचणी तत्काळ मार्गी लावण्यावर भर देत शिबिरामध्ये विविध महसूल प्रकरणांचे निराकरण, अर्ज स्वीकृती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान दिव्यांग नागरिक तसेच लहान मुलांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला तहसीलदार प्रीती डुडूलकर, नायब तहसीलदार कुंभरे, नायब तहसीलदार भोके मॅडम, नायब तहसीलदार धात्रक, नगर परिषद मुख्याधिकारी सतीश चौधरी, डॉ. गहाणे, पुरवठा निरीक्षक अधिकारी, कृषी पर्यवेक्षक शीतल खोब्रागडे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धनपाल मिसार, माजी उपसभापती नितीन राऊत, अपर्णा राऊत, कमलेश बारस्कर, संतोष मसराम, लिलाधर भर्रे, मामीडीवार, पत्रकार किशोर मेश्राम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments