Homeगडचिरोलीउन्हाच्या तडाख्यात भिवापुरे परिवाराचा दिलासादायक उपक्रम.

उन्हाच्या तडाख्यात भिवापुरे परिवाराचा दिलासादायक उपक्रम.

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

चामोर्शी : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने भिवापुरे परिवाराकडून शहरातील बाजारपेठ परिसरात मोफत पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून प्रवासी, कामगार तसेच बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे.
नगरपंचायतीचे बांधकाम सभापती वैभव भिवापुरे आणि नगरसेविका वर्षा भिवापुरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. बाजारपेठेतील त्यांच्या कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या या पाणपोईवर दिवसभर स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून नागरिक मोठ्या प्रमाणात या सुविधेचा लाभ घेत आहेत.
सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती भिवापुरे परिवाराने दिली.
या पाणपोईमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिक, रिक्षाचालक, मजूर, प्रवासी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करत भिवापुरे परिवाराचे आभार मानले असून उन्हाळ्यात अशा उपक्रमांची गरज असल्याचेही सांगितले.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments