सामाजिक कार्यकर्ती कुमुदिनी भोयर यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा
मूल प्रतिनिधी लोकवाद : सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असलेल्या सामाजिक कार्यकर्ती कुमुदिनी भोयर यांचा वाढदिवस यावर्षीही समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहिताचे उपक्रम राबविण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. “वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे,” अशी भावना कुमुदिनी भोयर यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, शिवसेना जिल्हाप्रमुख भारती राकडे, संजीवनी वाघरे, कल्पना मेश्राम, सतीश राजुरवार, शशिकांत गणवीर, निलेश राय, रोहित कांबळे, आनंदराव कुडे, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, प्रफुल मेश्राम, गौरव बावनकर, विशाल नागुलवार, प्रफुल तुंगिडवार, राहुल गिरडकर, मेश्राम सर, साहिल भोयर, साहिल टेकाम आदी सामाजिक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.
वृक्ष लागवडीमुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश तर फळ वाटपामुळे रुग्णांना आधार व दिलासा मिळाला. कुमुदिनी भोयर यांच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.







