लोकमान्य हिंदी माध्यमिक विद्यालय गौरीपूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, वार्षिक निकाल जाहीर चामोर्शी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२६ रोजी लोकमान्य हिंदी माध्यमिक विद्यालय, गौरीपूर येथे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७.३० वाजता ग्रामीण किसान बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, मुरखडा मालचे संचालक श्री हरिदास मंगल सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांपैकी नुकतेच पोलीस सेवेत निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये राजेश मंडल, करण विश्वास, कु. प्रीती मशीद आणि कु. अनिशा मिस्त्री यांचा समावेश होता. त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान सत्र २०२५-२६ चा वार्षिक निकालही जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करत शिक्षकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री देवानंद उराडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री सौरभ कांती हलदर यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील पालकवर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.