Homeगडचिरोलीतालुक्यात ‘शिवाजी’ची तिहेरी बाजी; पहिला, दुसरा-तिसराही क्रमांक पटकावत चामोर्शीतील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा...

तालुक्यात ‘शिवाजी’ची तिहेरी बाजी; पहिला, दुसरा-तिसराही क्रमांक पटकावत चामोर्शीतील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकालात अभूतपूर्व दबदबा!

सोनू वाळके, उपसंपादक, लोकवाद न्युज.

 

चामोर्शी (प्रतिनिधी):
चामोर्शी तालुक्यातील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या बारावी निकालात ऐतिहासिक यश मिळवत संपूर्ण तालुक्यात आपला ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे विज्ञान शाखेत तालुक्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही क्रमांक शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावत अभूतपूर्व कामगिरी नोंदवली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात महाविद्यालयाच्या निकालाचा दबदबा निर्माण झाला आहे.
महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 67 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत कु. धनश्री उमाजी कुनघाडकर हिने 83.33 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. मयूर कमलाकर कुनघाडकर याने 82.67 टक्के गुणांसह तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. साहिती श्रीकांत ओलालवार हिने 81.83 टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय स्थान मिळवले. विज्ञान शाखेतील संपूर्ण तालुक्यातील टॉप तीन विद्यार्थी हे शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचेच असल्याने ही कामगिरी विशेष ठरली आहे.
कला शाखेतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. दिलाशा दिलीप वनकर हिने 80 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. कु. सानिका केशव उडान हिने 79.17 टक्के गुण मिळवत द्वितीय स्थान पटकावले, तर कु. कोमल सुरेश शेंडे हिने 77.50 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश गौरकार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि शिक्षकवर्गाच्या मार्गदर्शनामुळे हा उत्कृष्ट निकाल साध्य झाला आहे. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोलीचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्यामसुंदर भरे यांनीही सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्राचार्यांचे मत:
“विज्ञान शाखेत तालुक्यातील पहिल्या तिन्ही क्रमांकांवर आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांची चिकाटी, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास यामुळेच हा निकाल शक्य झाला आहे. भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण देत विद्यार्थ्यांना अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अविनाश गौरकार यांनी केले.
या उल्लेखनीय यशामुळे शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने चामोर्शी तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments