HomeBreaking Newsबुद्ध पौर्णिमा व महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त फळ वाटप; समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

बुद्ध पौर्णिमा व महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त फळ वाटप; समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

🔵 बुद्ध पौर्णिमा व महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त फळ वाटप; समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

मूल प्रतिनिधी लोकवाद;   बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन या त्रिसूत्री पवित्र व प्रेरणादायी दिवसांच्या निमित्ताने आज समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष दिलीप रामटेके यांच्या पुढाकारातून नागरिकांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

या उपक्रमादरम्यान सुरेश भाऊ गेडाम, पत्रकार दुर्योधन घोंगडे तयूबखान पठाण, तुळशीदास रामटेके, नानाजी दंडीकवार, राजेंद्र साजनपवार, चंद्रमणी चोखंद्रे, अभिजित चेपूरवार, सुरेश गावतुरे, विवेक खोब्रागडे यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती लाभली. सर्वांनी एकत्र येत समाजातील सर्व घटकांपर्यंत आनंद आणि सकारात्मक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

या प्रसंगी Gautama Buddha गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्यावरही प्रकाश टाकण्यात आला. भगवान बुद्धांनी दिलेला समता, अहिंसा, करुणा आणि मध्यम मार्ग हा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग दाखवत मानवतेला नवी दिशा दिली. “अप्प दीपो भव” म्हणजेच स्वतःचा प्रकाश स्वतः बना, हा त्यांचा संदेश प्रत्येकाला आत्मनिर्भर व सजग बनवतो.

महाराष्ट्र दिन राज्याच्या अभिमानाची जाणीव करून देतो, तर कामगार दिन श्रमिकांच्या कष्टांची कदर करण्याचा दिवस आहे. या तिन्ही दिवसांचे औचित्य साधत केलेला हा उपक्रम समाजात एकोपा, सहकार्य आणि सेवा भाव वाढविणारा ठरला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अशा सामाजिक उपक्रमांची परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

lokwad
lokwadhttps://lokwad.in/
दुर्योधन विलास घोंगडे मुख्य संपादक mob. 9881197843
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments